द्वारे आयोजित: BMM ध्यान आणि स्वत: ची काळजी ध्यान ऐकण्या-बोलण्याचे! भान नटाचे!!
सादरकर्ते: धनंजय गोखले (DG)
जे आपण आयुष्यभर करत आलो त्याचाच वापर करून स्वतःचा शोध घेतला तर? कुठे करणार वापर? ध्यानात तर गप्प बसायचं असतं, तर बोलताना ध्यान जमेल? कशी करायची प्रॅक्टिस ? हे जग जर रंगभूमी असेल तर ध्यान नक्की कुणी करायचं? कशाचं ? कधी? कसं? ध्यान करायचं असतं? की ध्यान ठेवून काही करायचं असतं ? ध्यान जमायला लागलं हे कसं समजायचं? कसं मोजायचं? कधी? कुणी? वगैरे वगैरे….
रविवार 13 ऑक्टोबर I सकाळी 11 EDT (US) ( 8:30 PM भारत)